दिनाक,०९ डिसेंबर २०२०
किनगाव राजा:- तालुक्यात सध्या अवैध वाळू वाहतूक जोमात चालू आहे. सिंदखेड राजा तालुक्यात जाणारी खडक पूर्णा नदीच्या पात्रात तून अवैद्य प्रकारे रेती उपसा जोमात, सुरू आहे.पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया आणि गुन्हे शाखेचे प्रभारी पी आय बळीराम गिते यांचे आदेशानुसार देऊळगांव, मेहकर परिसरात अवैध धंदे व गौण खनिज चोरी बाबत माहिती मिळताच पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथील कर्मचाऱ्यांसह पंचा समक्ष अवैद्य रेती वाहतूक करताना एक MH 28C 6459 क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्राली सह अंदाजे किंमत 5, 00, 0000- ज्या मध्ये अंदाजे 1ब्रास रेती किंमत अंदाजे 5000/- रु एकूण किंमत 5, 05, 000/- रू ची आहे अवैध प्रकारे रेती चोरी ने वाहतूक करताना पकडले वाहन चालक अक्षय भगवान लष्कर वय 23 वर्षे मुद्देमाल सह ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन साखरखेर्डा येथे भा द वि 379, नुसार गुन्हा नोंद करणे करिता ताब्यात दिले आहे,
सदर कार्येवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय श्रीकांत जिंदमवर , ए एस आय प्रकाश राठोड,श्रीकृष्ण चांदुरकर ,गीता बामंदे ,नदीम शेख चालक सचिन जाधव व पोलिस स्टेशन साखरखेर्डा येथील कर्मचारी मिळून सदर कारवाई केली