बोगस अकृषिक आदेश व नकाशा जोडून खरेदीखत नोंदणी करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या दुय्यम निबंधक पी.डी.दहिवाळ यांची तडकाफडकी बदली.


 परळी (प्रतिनिधी बाबा शेख)

दुय्यम निबंधक कार्यालय परळी वैजनाथ येथे बोगस अकृषिक आदेश व नकाशा जोडुन तसेच मुंद्राक व नोंदनी शुल्क बुडवून खरेदीखत नोंदणी करणाऱ्या पी.डी. दहिवाळ यांची तक्रार ॲड.परमेश्वर आर.गित्ते यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिली होती. त्यामुळे चौकशी होवून दहीवाळ यांच्या बदलीची कार्यवाही करण्यात आली आहे.

        दुय्यम निबंधक कार्यालय परळी वैजनाथ येथे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी,व जिल्हाधिकारी यांचे बोगस अकृषिक आदेश व नकाशा जोडुन खरेदीखत नोंदणी तसेच महामार्ग लगतच्या जमीन मिळकतीचे मुंल्यांकन कमी करुन मुंद्राक व नोंदनी शुल्क बुडवून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला असुन फसवणूक करणाऱ्या पी.डी.दहिवाळ यांची तक्रार परळी वैजनाथ येथील ॲड. परमेश्वर आर.गित्ते यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे दिली असता जिल्हाधिकारी बीड यांनी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमुन चौकशी करण्याचे आदेश दिले वरुन चौकशी करण्यात आली, प्रतीबंधीत,कुळाची,वर्ग 2, तसेच कर्ज बोजा असलेल्या जमीन मिळकतीच्या विना परवाना शासनाची फसवणूक दलालांशी संगनमताने विक्री केल्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे.या प्रकरणात श्री. अनिल नढे,सह जिल्हा निबंधक वर्ग 1,बीड यांनी पी डी दहिवाळ, दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांची तडकाफडकी धारुर येथे बदली करण्याचे आदेश दि.०१/१२/२०२० रोजी दिले आहेत.

       जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या प्रकरणात लक्ष दिले असून मोठ मोठे प्रकरणे उघडकीस येणार असल्याची माहिती ॲड.परमेश्वर गित्ते यांनी दिली आहे.