नेकनूर : येथील शेतकरी सर्वज्ञ पाटील यांचे शेतातली १०० रा. डी. पी. २०.११.२०२० रोजी रात्री जळालेली आहे. त्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने ०४.१२.२०२० पर्यंत जर डी.पी. बसविली नाही तर दि. 0५.१२.२०२० रोजी नेकनूर महावितरण कार्यालयाच्या विरोधात कार्यालयासमोर बेमुदत (साखळी उपोषणाला) बसणार आहे असे लेखी निवेदन नेकनूर चे भाजपा जेष्ठ नेते व शेतकरी समाजसेवी सय्यद शोहीब उर्फ आमदार यांनी लेखी निवेदन वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता साहेब म. वि. कं. बीड उपकार्यकारी अभियंता साहेब, उर्जामंत्री ना. परब साहेब, माजी मंत्री पंकजाताई साहेब, विरोधी पक्ष नेते फडणवीस साहेब, विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा. प्रविण दरेकर साहेब, ना. धनंजय मुंडे साहेब, पालकमंत्री बीड खा. डॉ. प्रितमताई साहेब, केज विधानसभा चे आ. नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देऊन डी.पी. बसवा नसता लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाचे निवेदन शेतकरी सय्यद शोहीब उर्फ आमदार यांनी मागणीद्वारे दिले आहे.
वीज नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांना पाणी देता येत नसल्याने पाक सुकुन चालले आहे. विहीर, तलाव, नदी बोर इत्यादी पाण्याने भरून पडले आहे मात्र फक्त वीज नसल्यामुळे मोटरी चालू करता येत नसल्याने पिके सुकुन जात आहे.
वरिष्ठ अधिकारी साहेबांनी तात्काळ डी.पी. बसवावी व होणारे शेतकऱ्यांचे होनारे नुकसान वाचवावे अशी मागणी सय्यद शोहीब यांनी केली आहे.
महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण – सय्यद शोहीब