(मुंबई वार्तहार):शासनाने राज्यातील सर्व विनाअनुदान शाळांचे शिक्षकांनची भावनांशी खेळणे बंद करूनतपासणीचे आदेश रद्द करा,अनूदान वितरण चा आदेश काढा अशी मागणी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी मुख्यमंत्री मा, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मा,अजीत पवार यांच्या कडे केली आहे.19 सप्टेंबर 2019 ला आदेश काढला, त्यानंतर 14 ऑक्टोबर 2020 परत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला, पूर्वीचा आदेश रद्द केला व परत 1 नोव्हेंबर 2020 पासून अनुदान लागू होईल हे सांगितले, तसे असताना मागील 19 महिन्याचा पगार शासनाने देणे आवश्यक असताना गप्प केला,पुढील टप्पा देणेबाबत तपासणीसाठी परत 1 डिसेंबर रोजी पत्र काढले,आजपर्यंत कधी पुढील टप्पा देणेसाठी कधी तपासणी करण्यासाठी कधी आदेश निर्गमित झालेले नाही. यापूर्वी अनुदान दिले ते तपासणी करून देण्यात आले असताना आता तपासणीचे नाटक का ,ही विनाअनुदानित शाळांना वर अन्याय आहे.यापूर्वी सदरच्या सर्व तपासण्या व संबंधित पपत्र अ व ब भरून दिलेली आहेत,
तसेच गेल्या मार्च पासून कोरोना मुळे कोणत्याही शाळा सुरू नाहीत तर, यामध्ये अनेक मुद्दे असे आहेत की ,कोरोनामुळे काही मुद्दे पूर्ण होऊ शकणार नाहीत ,मग ही चुळबुळ का,यामुळे अनेक शाळांना नाहक त्रास देऊन पैसे काढण्याचे अधिकारी यांचे धंदे चालू होणार,
आम्ही तपासणीला घाबरत नाही पण या ही वेळ नाही आधी अनुदान सुरू करा, आता तपासणीचे काही कारण नाही, आधी अनुदान वितरित करा, मगच कागदपत्रे मागणी करा किंवा अनुदान वितरित करताना ही माहिती द्यावी लागणार आहे, त्यामुळे सदरची तपासणी रद्द करा,व आधी अनुदान वितरणाचे आदेश काढा,अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे वतीने मास्टर सिद्दिक अहमद, खलील बहुर, जमालुदधीन बंदरकर, यांनी केली आहे.