फैजपूर येथील शेख कौसर औरंगाबाद बीएड कॉलेज च्या टॉप टेन मध्ये


रावेर (शरीफ शेख) 
जळगाव जिल्ह्यातील 
   फैजपूर येथील शेख कौसर यांनी औरंगाबाद येथील बीएड कॉलेजमध्ये प्रचंड मेहनतीने अभ्यास करुन द्वितीय वर्षात टॉप टेन विद्यार्थ्यांमधे स्थान मिळवत यश संपादन केले आहे.यामुळे फैजपूर शहराचे नाव सर्वदूर प्रसिद्ध झालं असून शेख कौसर यांच्या या यशामुळे सर्व फैजपूर वासियांची मान गर्वाने उंचावली आहे.कौसर सर यांनी संपादन केलेल्या या यशामुळे अलखिझर सोसायटीतर्फे पठाणवाडी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन शेख कौसर सर यांचा सत्कार करण्यात आला.या छोटेखानी कार्यक्रमात अलखिझर सोसायटीचे अध्यक्ष डॉ.दानिश हाजी शेख निसार, उपाध्यक्ष मुजम्मिल काझी, समाजसेवक इम्रान शेख,तन्वीर सर,अलखिझर सोसायटीचे सहसचिव अल्ताफ खान, कोषाध्यक्ष रफीक सर, सल्लागार मोहम्मद अख्तर सर यांच्या उपस्थितीत शेख कौसर यांचा सत्कार करण्यात आला.अलखिझर सोसायटी संचलित डॉ.अब्दुल कलाम इंग्लिश मिडीयम स्कूल याठिकाणी शेख कौसर सर हे आपले अध्यापनाचे कार्य करत असुन त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी फैजपूर येथील काझी मुजाहिद,मुजाहिद राजकुमार,मुदस्सर शेख उर्फ मुदाभाई,मुजाहिद भाई,खालीद मुल्लाजी,साबीर शेख,नदिन डॉन,शोएब समद,मुबशीर जनाब शाहिद खान,राजु पेंटर,मोसीम सैयद यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.