शेतकऱ्याला 7/12 वरून वाचविण्यासाठी 8/12/20 च्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे--आमदार संजय गायकवाड


 


भारत बंदमध्ये शिवसैनिकांसह जनतेने सहभागी व्हावे-


बुलडाणा: कृषी विषयक कायदे आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. हे कायदे रद्द करण्यात यावे म्हणून देशपातळीवर आंदोलनाची धार तीव्र होत आहे. आठ डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या संपामध्ये शिवसेना देखील शेतकऱ्यांच्या बाजूने सहभागी असून शिवसैनिकांसह सर्व जनतेने या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.


भांडवल दारांचे हीत पाहणारे हे नवे कायदे आहेत. शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष यामुळे उफाळून आला आहे. कृषी विधेयकावरून राजधानी दिल्ली आणि परिसरात शेतकऱ्यांनी डेरेदाखल होत आपला आवाज बुलंद केला आहे. देशातील विविध भागातून शेतकरी कृषी विधेयक रद्द करण्यासाठी आठ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हे काळे कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी शिवसैनिकासह सर्व जनतेने सुद्धा संपामध्ये सहभागी व्हावे